मले बी होते,
तुमालेबी होते,
करोना हाय असा,
तो कोनालेबी होते,
ना पाह्यते जात,
ना पाह्यते अमिरी-गरिबी,
देश विदेशात फैलली,
हे खतरनाक बिमारी...
कायजीच घेणं हाय,
फक्त आपल्या हातात,
बाहेर जाऊन कामुन,
जीव टाकता धोक्यात..
एकाची बी चूक,
अंगलटी येऊ शकते,
लागण ह्या रोगाची,
दारोदारी पोहचू शकते..
मस्ती नका आणू,
माज नका करू,
माणुसकीची सांगतो,
लाज नका काढू..
आपल्यापेक्षा नाहीतर,
जनावरं तरी बरी,
मालकाच्या मतानं,
ऐकतात तर खरी..
आपल्या सूंदर देशाचा,
मसनवटा नका करू,
धोका ओळखा पुढचा,
बेमौत नका मरू.
तुमालेबी होते,
करोना हाय असा,
तो कोनालेबी होते,
ना पाह्यते जात,
ना पाह्यते अमिरी-गरिबी,
देश विदेशात फैलली,
हे खतरनाक बिमारी...
कायजीच घेणं हाय,
फक्त आपल्या हातात,
बाहेर जाऊन कामुन,
जीव टाकता धोक्यात..
एकाची बी चूक,
अंगलटी येऊ शकते,
लागण ह्या रोगाची,
दारोदारी पोहचू शकते..
मस्ती नका आणू,
माज नका करू,
माणुसकीची सांगतो,
लाज नका काढू..
आपल्यापेक्षा नाहीतर,
जनावरं तरी बरी,
मालकाच्या मतानं,
ऐकतात तर खरी..
आपल्या सूंदर देशाचा,
मसनवटा नका करू,
धोका ओळखा पुढचा,
बेमौत नका मरू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा