*रोज थोडा मरतोय मी,*
*पण तुझ्याचसाठी जगतोय मी..*
रोज एक कविता,
रचतोय मी,
आठवणीत तुझ्या,
भिजतोय मी..
असून सुद्धा,
नसतोय मी,
अस्तित्वच जणू,
भुलतोय मी..
शून्यात कुठेतरी,
हरवतोय मी,
एकटाच खुळ्यागत,
हसतोय मी..
नित्य तुझ्यात,
गुंततोय मी,
स्वतःला तुझ्यात,
बघतोय मी..
रोज थोडा,
मरतोय मी,
पण तुझ्याचसाठी,
जगतोय मी..