*व्यंग हास्यरस कविता*
_आजच्या नाट्यमय घडामोडीवर सुचलेली कविता, कृपया कवितेकडे केवळ व्यंग म्हणून बघावे._
कानोकान नवती,
कोनालेबी खबर..
रातोरात देल्ला भाऊ
दनका लै जबर..
पोरगी झालती पसंद,
पन बैठका लै झाल्या,
अशातच दुसऱ्यानं,
नंबर मारून देल्ला..
समद शिजून तैयार,
पन गंज गेला उलटून..
बैठका घेन्या घेन्यात,
डाव गेला पलटून,
रातोरात उसातली,
साखर झाली गायब,
धनुष्याची तार,
खिचत राह्यले सायब..
बारशाच्या तयारीत,
बिझी होता पंजा,
म्होरली तारीख देऊ देऊ,
थकला होता संज्या..
तोंडात बोटं टाकून,
समदे रायले पाह्यत
गाभण म्हैस राह्यली,
नुसत्या कळा काहळत..
राजकारनात काय होईन,
ह्याचा नाही नेम,
म्हनून म्हनतो कोनावर,
देऊ नका ब्लेम..
जे होते ते,
मुकाट्यानं पा,
थंडीचा मजा,
झटक्याईन घ्या.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा