बुधवार, २५ मार्च, २०२०
* मरण पाहिले मी डोळा...*
मित्रांनो किमान १५ दिवस आधी माझ्याकडे एक उच्चभ्रू ग्राहक वीज बिलाची तक्रार घेऊन आले. सहज कोरोनाचा विषय निघाला तर त्यांनी सांगितले की त्यांचा भाऊ इटलीमध्ये आहे आणि साक्षात मृत्यु तिथे दरवाजात उभा आहे अशी परिस्थिती तिथे आहे.
सर्वांनी घरात स्वतःला २० पेक्षा अधिक दिवसांपासून कैद करून ठेवलेले आहे आणि तेही अनिच्छित कालावधीपर्यंत..
टीव्हीवर बातम्यांमध्ये १००% दाखवत नाही माझा भाऊ आहे म्हणून परिस्थती मला माहिती आहे..
घराबाहेर निघाले का पोलीस उचलून नेतात अशी परिस्थिती तिथे झालेली आहे.
आपल्याकडे याहीपेक्षा भयानक परिस्थिती उदभवणार आहे, आपल्या देशातील लोकसंख्या, त्यांच बेशिस्त वागणं हे आपल्याला इतर देशांचा अनुभव असून गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे..
मी सुद्धा नेहमी प्रमाणे त्या गोष्टीला तेव्हा लाईटली घेतले, जसे आज आपण घेत आहोत..
पण त्यांनी सांगितलेल्या आज प्रत्येक गोष्टी खऱ्या होत आहे. तो मृत्यूचा थैमान मला डोळ्यांनी दिसत आहे.
मित्रांनो हे लाईटली घेणंच आपल्याला महागात पडेल..
आपण करोनावर जोक्स काय केले त्यावरून आपलं या महामारीविषयीच गांभीर्य दिसून येते.
जुन्या काळी महामारी यायची तेव्हा लोकांपर्यंत सर्व सोयी नव्हत्या, बिमारीच निदान देखील लागायचं नाही..गावच्या गावं खाली व्हायची..
आज आपल्याकडे सर्वच आहे.
एका क्षणात आपल्याकडे सर्व माहिती पोहचते..
पण सर्व असून सुद्धा आपलं लाईटली घेणं, वागणं आपल्याला पर्यायाने सर्व देशाला मृत्यूत ढकलणार आहे.
सरकार घरात थांबायला सांगत आहेत, प्रधानमंत्री हात जोडून विनंती करीत आहे कृपया त्यांच्या सुचनांची पायमल्ली करू नका..
पुढील २१ दिवस करोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवणे अतिआवश्यक आहे..
अस म्हणत पडल्याशिवाय शहाणपण येत नाही.. पण सध्या घराबाहेर पडू नका.. इतर देशांपासून अनुभव घेणे आवश्यक आहे..
आज आपण हे २१ दिवस पाळले नाहीत तर अजून कितीतरी अनिश्चित महिने घरात बंदिस्त व्हावे लागेल आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल..
करोना ही अशी बिमारी आहे की यामध्ये मृत्यू जर झाला तर मयतीला देखील कुणी हजर राहणार नाही..
मला काही होत नाही, भगवंत पाठीशी आहे म्हणून शहाणपण मारू नका. वेळीच सावध व्हा अजूनही वेळ गेलेली नाही..एकाची छोटीशी चूक सर्वांना भारी पडू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मी उद्योजक होणार
मी उद्योजक होणार ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्...
-
* **जाणीव झाली मला,* *स्वतः बनल्यावर मी आई,* ९ महीने उदरात तुझ्या, वाढले मी आई, किती त्रास तुला, झाला असेल आई, खरंच किती ग्रेट, आ...
-
थांबुनी थोडा, तू घे उसासा, मिठीत माझ्या, तू घे विसावा... मिठीत तुझ्या, देह स्थिजावा, श्वासात तुझ्या, श्वास भिनावा.. प्रेमाचा...
-
* व्यंग हास्यरस कविता* _आजच्या नाट्यमय घडामोडीवर सुचलेली कविता, कृपया कवितेकडे केवळ व्यंग म्हणून बघावे._ कानोकान नवती, कोनालेबी खबर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा