रविवार, २९ मार्च, २०२०

समाज



काल मला एक नाटक बघण्याचा योग आला. त्या नाटकातील एक संवाद असा होता,



*समाजाला स्वतःच डोकं नसते, त्याला असतात त्या फक्त भावना........*




मी थोडा खोलवर विचार केला, खरंच असं असते का? तर उत्तर "होय" मिळालं.
समाजाला खरंच स्वतःच डोकं नसतं, असतात तर त्या फक्त भावना..
ज्या वाटेल त्याने भडकाव्यात किंवा त्या भावनेला हात घालून वाटेल तसा उपयोग करून घ्यावा.
समाज म्हटलं की त्यात कुठलीही एक व्यक्ती येत नाही तर येतो तो व्यक्तींचा समूह.
समूह म्हटल्यापेक्षा कळप म्हणने कधीही योग्य राहील; ज्यामध्ये समोरच्याने जिकडे म्हटले तिकडे कुठलाही विचार न करता जाणे.
आजकाल असंच चित्र बघायला मिळतं कुणी भावनांना दुखावतं तर कुणी त्या भावनांना स्पर्श करतयं आणि त्याला प्रतिसाद म्हणून समाज रस्त्यावर उतरतो.




कुण्या एका व्यक्तीला जर रस्त्यावर उतरायला सांगितले तर तो १० वेळा विचार करणार की, आपण जे करतोय किंवा करणार आहो ते चांगले आहे वाईट.. कारण त्याला स्वतःच डोकं असतं, पण समाजाला म्हटला की समाज वाटेल तसा बोटावर नाचवला जाऊ शकतो फक्त भावनेला हात घालायचा असतो.
आणि हो आपल्याकडे बरेचजणांना भावनेसोबत खेळण्यामध्ये *विशारद* प्राप्त झालेले आहे, त्यामुळे कृपया समाजाचा हिस्सा होतांना सावध असावे, आणि आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवावी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी उद्योजक होणार

  मी उद्योजक होणार  ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना  महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्...